स्थानिक कारागीर
Supports local craft
आमच्याबद्दल
राणे फार्म प्रॉडक्ट्स च्या गार्गी गणेशा या ब्रँड नावाने कोकोपीट च्या गणपती मूर्ती विक्रीस उपलब्ध आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यामधील घुमडे या गावातील रहिवासी कलाकार श्री एकनाथ बाळकृष्ण राणे यांनी कोकोपीट आणि माती मिश्रण करून सुंदर अशा पर्यावरण पूरक गणेशाच्या मुर्त्या बनवण्याचे कार्य हाती घेतले आहे.
श्री राणे यांनी ‘जे जे इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्टस्’ मधून अप्लाइड आर्टस् (BFA)मध्ये पदव्यूत्तर शिक्षण घेतले असून ते बॉलीवूड मध्ये आर्ट डिरेकशन (कला दिग्दर्शन) चे काम करतात. त्यांनी अनेक हिंदी, मराठी, गुजराती, इंग्रजी फिल्म्स चे कला दिग्दर्शनाचे काम केले असून मराठी आणि गुजराती रंगभूमी वर पण ते सक्रिय आहेत.
कोकोपीट च्या गणपती मूर्ती वजनाने हलक्या व पाण्यामध्ये अर्ध्या तासाच्या आत विरघळणाऱ्या आहेत. या मुर्त्यांचे विसर्जन फिश टॅंक मध्ये करून त्याचे टेस्ट रिपोर्ट काढण्यात आले आहेत. या मुर्त्या पर्यावरणास खूप उपयोगी आहेत. या गणपतीचे विसर्जन आपण सर्व ठिकाणी जसे आपल्या बागेमध्ये, घरामध्ये, कॉलनीमध्ये, नदीमध्ये, समुद्रामध्ये कुठेही करू शकता आणि ते कमी वेळात विसर्जित होतात. विसर्जित झाल्यावर याची माती आपण आपल्या झाडांसाठी वापरू शकतो.
पर्यावरणाचे रक्षण हा ध्यास मनी धरून श्री राणे ह्या कोकोपीट च्या मूर्तींची निर्मिती सुरु केली आहे. पी ओ पी च्या मूर्तीना हा चांगला पर्याय असून यावर अधिकाधिक काम होणे अपेक्षित आहे. ठाणे महानगर पालिका, कॉयर बोर्ड यांनी या कामाची दखल घेतले आहे. अनेक संस्थांनी याबद्दल त्यांना पुरस्कृत केले आहे.
Why us
Coco-peat idols that are light, organic, and dissolve in about 30 minutes — then nourish your plants.
Supports local craft
Soil reused for plants
Fully organic mix
100% eco-friendly
Dissolves in 30 minutes
Price list
Coco-peat Ganesha idols with size, weight, and MRP. Enquire on WhatsApp to order.
₹1,900
₹2,500
₹2,500
₹2,800
₹3,500
₹6,000
₹9,000
₹3,500
Gallery
Handcrafted coco-peat Ganesha idols, home puja, and the people who shape each piece — tap any frame to view it larger.
Contact
For orders, wholesale, or a question about Gargee Ganesha idols — call or write to us.
Proprietor
Gargee Ganesha